प्राचार्य डोळे सर : संशोधनाचा निर्मळ मार्ग आणि एक निरिच्छ दर्शक
डॉ. डोळे सर हे खरे जगावेगळे व्यक्तिमत्त्व होते. नाही तर पीएच.डी.ची तोंडी परीक्षा म्हणजे परीक्षकांची पंचतारांकित सोय, यथोचित पाहुणचार करावा लागे. हजारोंचा खर्च अगदी सहज होत असे. माझ्या तोंडी परीक्षेसाठी खर्च झाला तो केवळ पंचवीस रुपये. हे सर्व आजच्या पीएच.डी. करणाऱ्या विद्यार्थ्यांना अजिबात खरे वाटणार नाही. पण ही वस्तुस्थिती आहे. डोळे सरांसारखी माणसे माझ्या आयुष्यात आली, हे माझे केवढे भाग्य!.......